[ahmednagar] - भातकुडगावला शेतकऱ्यांचा रास्ता रोको

  |   Ahmednagarnews

म. टा. वृत्तसेवा, शेवगाव

'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, जायकवाडी जलाशयालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला पूर्वीप्रमाणे आठ तास विजपुरवठा करावा, धनगर समाजाला आरक्षण मिळावे, आदी मागण्यांसाठी शेतकरी बचाव संघटनेच्या वतीने तालुक्यातील भातकुडगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष एकनाथ काळे व जिल्हा परिषदेचे सदस्य रामभाऊ काळे यांनी केले. मंडलाधिकारी सुनील लवांडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर एक तास चाललेले आंदोलन विसर्जित करण्यात आले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात, वयोवृद्ध शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपयांची पेन्शन मिळावी, धनगर समाजाला आरक्षण मिळावे, जायकवाडी जलाशयालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी आठ तास वीजपुरवठा करावा आदी मागण्या करत एकनाथ काळे, रामभाऊ काळे, सरपंच राजेश फटांगरे, ज्ञानदेव खरड, अशोक मेरड, अशोक दुकळे, मुकुंद जमधने, सचिन फटांगरे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. या वेळी बोलताना रामभाऊ साळवे म्हणाले की, 'शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये आपली जनावरे कशी जगवायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कांद्यासह अनेक पिकांना भाव नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. तातडीने या प्रश्नांची सोडवणूक सरकारने करावी, अन्यथा माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. मंडलाधिकारी सुनील लवांडे यांनी तुमच्या भावना सरकारला कळवण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे शेवगाव-नेवासा मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

फोटो - http://v.duta.us/dLzLzAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pWuwsgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬