[ahmednagar] - मुंडेंच्या मृत्यूची व्हावी आंतरराष्ट्रीय चौकशी

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

‘सीबीआय’सारखी तपास यंत्रणा देशात सत्तेवर असलेल्या भाजपने गुंडाळली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे चौकशी व्हावी,’ अशी मागणी ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी येथे केली.

लंडनमध्ये ईव्हीएम हॅकर सय्यद शुजा याने सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात २०१४ च्या निवडणूक काळात ईव्हीएम हॅक करणाऱ्या टीममधील स्वतःचा सहभाग, तसेच या टीममधील अन्य १०-१२ सदस्यांच्या झालेल्या हत्या, ईव्हीएम हॅकींग घोटाळ्याची माहिती असल्याने त्यातून गोपीनाथ मुंडे यांची झालेली हत्या, अशा विविध मुद्यांची माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना, ‘२०१४मध्ये ईव्हीएम हॅकिंगने ज्यांचा (भाजप) फायदा झाला त्यांची, त्या हॅकींग टीममधील अन्य सदस्यांच्या झालेल्या हत्यांची व ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू की हत्या या प्रकरणाची एकत्रित चौकशी आंतरराष्ट्रीय यंत्रणेद्वारे होणे गरजेचे असल्याचे सांगितले....

फोटो - http://v.duta.us/rXHhxwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/5GFWaAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬