[ahmednagar] - महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांएवढी वेतनवाढ द्या

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

'एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांएवढी वेतनवाढ देण्यात यावी,' अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे. 'अन्यथा पगारवाढ, कामगार विरोधी धोरण व खासगीकरण विरोधात राजव्यापी संवाद यात्रा व हिसाब दो आंदोलन करण्यात येईल,' असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

'राज्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे कर्मचारी व सरकारी कर्मचारी यांच्या वेतनात मोठी तफावत निर्माण झाली आहे. मार्ग परिवहन अधिनियम १९५० नुसार स्थापन झालेल्या उत्तरप्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ, हिमाचल प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ, गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. तसेच कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ, आंध्रप्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ, तेलंगना राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन दिले जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, अशी भुमिका आमच्या संघटनेची आहे,' अशी माहिती तिगोटे यांनी दिली. यावेळी प्रादेशिक सचिव राजेंद्र घुगे, विभागीय अध्यक्ष दिनकर लिपाणे, विभागीय सचिव सुरेश चौधरी, अमोल रणदिवे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/brWtiQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬