[ahmednagar] - स्वस्तात सोन्याच्या आमिषाने लुटणारे उघड

  |   Ahmednagarnews

एकाला अटक; तीन लाखांचा ऐवज हस्तगत

म. टा. प्रतिनिधी, नगर

पांढरीपूल येथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून दोघांना दहा लाखांना लुटण्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांत उघडकीस आणला. टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तीन लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

नगरमधील बुरुडगाव येथील अरुण ज्ञानदेव चव्हाण याला पकडण्यात आले आहे. बाळू नंदन काळे, करण नंदन काळे, नागेश हिंदुड्या चव्हाण, रामायण ज्ञानदेव चव्हाण, मितवान ज्ञानदेव चव्हाण, नंदन झुबेदार काळे, आदेश नंदन काळे अशी या टोळीतील आरोपींची नावे उघडकीस आली आहेत. स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने पुणे येथील व्यावसायिक दीपक नामदेव थोपटे व त्याचा मित्र कैलास दादासाहेब गोपनर यांना पांढरीपूल येथील खोसपुरी शिवारात बोलवून या टोळीने लुटले होते. या दोघांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी तपास करत बुरुडगाव येथून अरुण चव्हाण याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. तर लुटीचील ८३ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व मोबाइल असा ३ लाख ३ हजार रुपयांचा एवढ काढून दिला आहे. तर आरोपी हे काही सोन्याचे दागिने घेऊन फरारी झाले आहेत. या आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व एमआयडीसी पोलिस घेत आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/gTr1uAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬