[aurangabad-maharashtra] - कारागृहातील ३० जणांचे नोंदवले जबाब

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल कारागृहातील न्यायालयीन कैदी योगेश राठोड यांच्या मृत्यूप्रकरणी जेल पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हर्सूल पोलिस तपास करीत आहेत. मंगळवारपर्यंत तीस जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले.

कारागृहातून जप्त केलेली हार्डडिस्क नादुरूस्त असून, ती तपासणीसाठी मुंबई येथील कलीना लॅबमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मारहाणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला कैदी योगेश राठोड याला जखमी अवस्थेत १८ जानेवारी रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत राठोडच्या नातेवाईकांनी दोन दिवस घाटीसमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, याप्रकरणी जेल अधीक्षक तसेच इतरांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. हर्सूल कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी देखील कारागृह अंतर्गत विभागीय चौकशी सुरू केली आहे. हर्सूल पोलिस ठाण्याचे पोलिस पथक देखील दोन दिवसापासून कारागृहातील बंदिवान तसेच कर्मचाऱ्यांचे जबाब घेत आहेत. मंगळवारी आणखी चार जणांचे जबाब घेण्यात आले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/DM61UAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬