[aurangabad-maharashtra] - घाटीतील लिफ्टसमोर प्रसुती; बाळ दगावले

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीत प्रसुतीसाठी आलेली महिला वॉर्डमध्ये नेत असताना बंद लिफ्टसमोर व्हरांड्यातच प्रसूत झाली, मात्र या घटनेत अर्भक दगावल्याची घटना सोमवारी (२१ जानेवारी) मध्यरात्री पाऊणच्या सुमारास घडली. छावणी परिसरातील महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्यानंतर तिला नातेवाइकांनी घाटीत आणले. लिफ्टकडे चालत जात असताना महिला लिफ्टच्या दारातच प्रसूत झाली. या वेळी लिफ्ट बंद होती व त्यामुळेच तिचे बाळ फरशीवर पडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर बाळ व बाळंतिणीला अपघात विभागात दाखल करण्यात आले, मात्र अर्भकाचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने म्हणाले, 'संबंधित महिला रस्त्यातच प्रसूत झाली असली तरी प्रसुती उभ्याने होत नाही. त्यामुळे बाळ खाली पडण्याची शक्यता नाही. त्याचवेळी बाळ रडले नसल्याने इतर कारणामु‍ळे बाळाचा मृत्यू असू शकतो.'

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1apdsAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬