[aurangabad-maharashtra] - पान टपऱ्यांवर बडगा

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात सर्रासपणे बेकायदा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असताना इतक्या दिवस दुर्लक्ष करणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाला मंगळवारी अखेर जाग आली. तंबाखू नियंत्रण पथकांनी विविध भागात २४ पान टपऱ्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल केला.

तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असताना शहरात अनेक टपऱ्यांवर गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते. शाळा, महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरातही अशा टपऱ्या नसाव्यात, याकडे दुर्लक्ष करून तिथेही टपऱ्या थाटलेल्या आहेत. इतके दिवस निद्रीस्त असलेल्या अन्न व औषध प्रशासन, गुन्हे शाखा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण पथकांना जाग आली. तेव्हा त्यांनी मंगळवारी शहरातील विविध भागांमधील टपऱ्यांची तपासणी करत कारवाई केली. घाटी परिसर, विद्यापीठ गेट, टाऊन हॉल आणि औरंगपुरा परिसरात एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (नियंत्रण) कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २४ विक्रेत्यांकडून पाच हजार रुपये दंड वसूल केला. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (विक्री, विपणन, आवेष्टन जाहिरात) नियंत्रण कायदा २००३ नुसार शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस मनाई आहे. तसेच प्रत्येक विक्रेत्याने आपल्या दुकानात १८ वर्षाखालील मुलांना तंबाखू पदार्थ विक्री केले जाणार नाही असा फलक लावणे अनिवार्य आहे. मात्र, शहरातील अनेक पानटपरी चालक या नियमांचे पालन करीत नसल्याचे यावेळी आढळून आले. मागील वर्षी जिल्हा तंबाखू नियंत्रण समितीने शहरातील पान टपरी चालकांना या नियमांची माहिती व्हावी म्हणून कार्यशाळा आयोजित केली होती. मात्र, याचा परिणाम झाला नाही. यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पथकामध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. अमोल काकड, डॉ. दहिवाळ, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, पोलिस उपनिरीक्षक अफरोज शेख यांचा समावेश होता....

फोटो - http://v.duta.us/1OMMiAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/cl6lygAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬