[aurangabad-maharashtra] - समांतरचा आठवड्यात निर्णय

  |   Aurangabad-Maharashtranews

सीटी वॉटर युटिलीट कंपनीने पत्रातून भूमिका केली स्पष्ट

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एसपीएमएल आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने महापालिकेला आपली भूमिका स्पष्ट करणारे पत्र पाठवले आहे. या पत्राच्या अनुशंगाने आठवडाभरात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

समांतर जलवाहिनीच्या पीपीपी तत्वावरील कराराचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. त्यानंतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी नेमलेल्या एसपीएमएल व औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर महापालिका अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. शासनाच्या स्तरावर देखील याबद्दल बैठका झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील व्हिडिओ कॉन्फरसिंगच्याव्दारे महापालिकेच्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. समांतर जलवाहिनीबद्दल लवकर निर्णय घ्या, शासन आवश्यक ती मदत करण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कंपनीच्या प्रतिनिधींनी मात्र एसपीएमएल ऐवजी एस्सेल ग्रुपला समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी मुख्य भागीदार करा, अशी मागणी महापालिकेकडे लाऊन धरली. एस्सेल ग्रुपला मुख्य भागीदार करता येते का या बद्दल महापालिकेने सरकारी वकिलांचे मत मागविले. एस्सेल ग्रुपला मुख्य भागीदार करता येणार नाही, असे स्पष्ट मत सरकारी वकिलांनी लेखी स्वरुपात व्यक्त केल्यावर महापालिकेच्या यंत्रणेने कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर ५ जानेवारी रोजी अंतिम बैठक घेतली. एस्सेल ग्रुपला मुख्य भागीदार करता येणार नाही, हे स्पष्टपणे कंपनीच्या अधिकाऱ्यांना या बैठकीत सांगण्यात आले. एस्सेल ग्रुपला मुख्य भागीदार करता येणे शक्य नसेल तर कंपनी समांतर जलवाहिनीचे काम करू शकणार नाही, कंपनी या कामातून माघार घेत आहे. कंपनीने खर्च केलेली १३५ कोटींची रक्कम महापालिकेने कंपनीला द्यावी, अशी मागणी कंपनीतर्फे करण्यात आली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/30_lGQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬