[aurangabad-maharashtra] - १९ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील तब्बल १९ हजार शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही, हे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत, असे वास्तव मंगळवारी

राज्यात व केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेनेच उघड केले. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध बँकांमध्ये जावून कर्जमाफीच्या संदर्भात माहिती घेतली. तेव्हा हा भांडाफोड झाला.

प्रारंभी शिवसेनेचे शिष्टमंडळ महाराष्ट्र बँकेत धडकले. विभागीय व्यवस्थापक संजय हिरेमठ, बँकेचे कृषी अधिकारी मंगेश देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शिष्टमंडळाला माहिती दिली. जिल्ह्यात कर्जमाफीसाठी ३३ हजार ६७८ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी सहा हजार शेतकऱ्यांचे अर्ज नाकारण्यात आले. १३ हजार ८१६ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला, असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यातूनच १९ हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित असल्याचे स्पष्ट झाले, असे शिवसेनेने म्हटले आहे. सिडकोतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. बँकेचे विभागीय व्यवस्थापक पी. शेषू बाबू, क्षेत्रीय व्यवस्थापक नीलम उपाध्येय, जालनाचे क्षेत्रीय व्यवस्थापक राघवेंद्र पटेल यांनी कर्जमाफी बद्दल माहिती दिली. जिल्ह्यात ग्रीनलिस्ट मध्ये असलेल्या ३० हजार ७१२ शेतकऱ्यांपैकी २२ हजार ८०० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी,सहसंपर्क प्रमुख अण्णासाहेब माने, जिल्हा परिषद सदस्य प्रा. रमेश बोरनारे, अंकुश रंधे, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, कृष्णा पाटील डोणगावकर, जिल्हा परिषद गटनेते अविनाश गलांडे, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, रमेश पवार, उदयसिंग राजपूत, मच्छिंद्र देवकर, सोयगावचे तालुकाप्रमुख दिलीप मचे, नगरसेवक सुदर्शन अग्रवाल, सिल्लोडचे उप तालुकाप्रमुख रघुनाथ घडामोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/tKRf6QAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬