[jalgaon] - अवैध वाळूउपसा; जेसीबी पकडले

  |   Jalgaonnews

तितूर नदीपात्रातून २९ लाखांचा मुद्देमाल जप्त

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

तालुक्यातील हिंगोणेसिम येथील तितुर नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा करणारे एक जेसीबी, एक डंपर व वाळू असा २९ लाखांचा मुद्देमाल गावकऱ्यांनी तहसीलदारांना पकडून दिला आहे. गावकऱ्यांना पाहताच जेसीबी मालक व चालकाने नदीपात्रातून पळ काढला. या प्रकरणी तिघांविरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हिंगोणेसिम येथील बंधाऱ्यालगतच्या तितूर नदीपात्रातून गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. याबाबत गावकऱ्यांकडून महसूल विभागाकडे तक्रारीदेखील करण्यात आल्या. परंतु, याचा उपयोग होत नसल्याने हिंगोणेसिम येथील ग्रामस्थ नदीपात्रात पाळत ठेवून होते. मंगळवारी (दि. २२) पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांना नदीपात्रात जेसीबीद्वारे वाळूचे उत्खनन करून ती डंपरमध्ये भरल्या जात असल्याचे दिसल्याने ग्रामस्थांनी एकत्र येत नदीपात्रात धाव घेतली. मोठ्या संख्येने ग्रामस्थ येत असल्याचे पाहून डंपर मालक व चालक यांनी जेसीबी व डंपर नदीपात्रात सोडून पळ काढला. ग्रामस्थांनी लागलीच या घटनेची माहिती तहसीलदार कैलास देवरे यांना दिली. तहसीलदार देवरे यांनी मंडळ अधिकारी आर. एन. कुळकर्णी, प्रभारी तलाठी प्रवीण महाजन, नीलेश अहिरे यांना सोबत घेत हिंगोणेसिम गाठून विना क्रंमाकांचे जेसीबी, वाळूने भरलेले एक डंपर (एम.एच. १९, सी.वाय. २१११) जप्त केले. जेसीबी प्रभाकर पाडुरंग चौधरी यांचे आहे.

फोटो - http://v.duta.us/FdV3hQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pJl3kAAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬