[jalgaon] - ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाने तरुणाची फसवणूक

  |   Jalgaonnews

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

ऑनलाइन ट्रेडिंग करण्याचा बहाणा करून दहा दिवसांत विविध फोनच्या करीत जळगावातील एका तरुणाची ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

शहरातील नेहरूनगर परिसरात राहणारा हा तरुण शेअर मार्केट तसेच एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. दि. ९ जानेवारी रोजी त्याला एक फोन आला. उपेंद्र शर्मा असे नाव सांगत भामट्याने तरुणास फॉरेक्स फक्टरी नावाच्या कंपनीत ट्रेडिंग करण्याची माहिती दिली. त्यानुसार खाते सुरू करण्याच्या नावाने सुरुवातीला ऑनलाइन पद्धतीने १० हजार रुपये जमा केले. यानंतर दि. १९ जानेवारी रोजी मार्जीनसाठी ३० हजार रुपये मागितले. तरुणाने तेही ३० हजार रुपये जमा केले. यानंतर भामट्याचा फोन लागला नाही. किंवा त्यांनी दिलेल्या कंपनीची ऑनलाइन साईटदेखील बनावट असल्याचे तरुणाच्या लक्षात आले. यानंतर तरुणाने मंगळवारी (दि. २२) सायबर क्राइम पोलिस ठाण्यात तक्रार दिली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/L0mqvAAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬