[jalgaon] - बाजार शुल्कावरून स्थायी सभेत खडाजंगी

  |   Jalgaonnews

भाजपकडून प्रस्ताव अमान्य; आर्थिक नुकसान केल्याचा सेनेचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिका प्रशासनाने हॉकर्सकडून दैनंदिन बाजारशुल्क वसुलीसाठी मक्त्याला मंजूरी देण्याचा प्रस्तावावरून मंगळवारी (दि. २२) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मनपाची वसुली, विक्रेत्यांची संख्या व मक्त्याच्या रकमेत तफावत असल्याचा आरोप करीत भाजपने बहुमताने हा प्रस्ताव अमान्य केला तर प्रस्ताव नाकारून भाजप महापालिकेचे नुकसान करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला.

मनपा स्थायी समितीची सभा मंगळवारी (दि. २२) सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, चंद्रकांत खोसे, नगरसचिव सुभाष मराठे उपस्थित होते. सभेत प्रशासनाकडून आलेल्या दैनंदिन बाजारशुल्क वसुलीसाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव भाजप नगरसेविका अ‍ॅड. शुचिता हाडा यांनी फेटाळून लावला. बाजार वसुलीचा विषय प्रशासनाने सध्याचा हॉकर्सच्या संख्येची गणना न करताच आणला असून, ठेक्याचा रकमेचे कुठलेही मुल्यांकन प्रशासनाने केले नसल्याचेही त्यांनी सांगितले....

फोटो - http://v.duta.us/SAo-sgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/x9FMkAAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬