[jalgaon] - महानगरी एक्स्प्रेसचे चाळीसगावात स्वागत

  |   Jalgaonnews

चाळीसगाव : रेल्वेस्थानकावर मंगळवार (दि. २२) पासून सचखंड एक्स्प्रेसला थांबा मिळाला. सकाळी ७.५५ वाजता ‘महानगरी’चे आगमन होताच प्रवाशांसह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर खासदार ए. टी. पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून ही गाडी पुढे मार्गस्थ केली. या वेळी आमदार उन्मेष पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. महानगरी एक्स्प्रेसला थांबा मिळाल्यामुळे सकाळी ७.४५ ला मुबंईकडे सोय झाली आहे. आता पहाटे सेवाग्राम एक्स्प्रेस पकडण्यासाठी लवकर उठण्याची गरज नाही. प्रवाश्याांसाठी डाऊनची महानगरी (११०९३) सकाळी ५.४५ वाजेला उपलब्ध होत आहे. त्यामुळे जळगाव येथून अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे. पहिल्याच दिवशी मुंबईकडे जाणाऱ्या १०० प्रवाशांनी गाडीचा लाभ घेतला.

रावेरलाही स्वागत

रावेर : रेल्वे स्थानकावर नुकताच महानगरी एक्स्प्रेसला थांबा देण्श्यात आला आहे. रविवारी (दि. २०) रेल्वे स्टेशनवर महानगरी एक्स्प्रेसचे भाजपसह प्रवासी संघटना, काँग्रेस व प्रवाशांतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी महानगरी एक्स्प्रेसला खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते पूष्पहार अर्पण करण्यात आला. रेल्वेचे लोकोपायलट पंकज सिंग, एस. एन. गुप्ता यांचे स्वागत करण्यात आले. अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त करून जल्लोष केला. रावेर येथून पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. त्यामुळे महानगरी प्रमाणेच या गाडीलाही थांबा मिळावा याबाबतही थांब्याची मागणी प्रशांत बोरकर व प्रवासी संघटनेने केली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/gWMX8wAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬