[jalgaon] - महापालिकेवर सावट खाते सील कारवाईचे?

  |   Jalgaonnews

‘हुडको’चा ३४१ कोटींचा हुकूमनामा कायम; डीआरएटीने फेटाळली याचिका

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिकेवरील कर्जापोटी हुडकोने डीआरटी कोर्टामार्फत बजावलेली ३४१ कोटी रुपयांची डिक्री (हुकूमनामा) नोटीस रद्द करण्यास डीआरएटीने नकार देत महापालिकेची याचिका सोमवारी (दि. २१) फेटाळून लावली. त्यामुळे आता हुडकोला कुठल्याही क्षणी बँक खाते सील किंवा मालमत्ता जप्त करण्यास मोकळीक असून, जळगाव महापालिकेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी (दि. २२) शिवसेनेचे माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी महापालिकेची याचिका फेटाळल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आयुक्तांनादेखील याबाबतची माहिती नसल्याचा दावाही लढ्ढा यांनी पत्रकारांशी बोलताना केला. अत्यंत महत्त्वाचा विषय असतानाही डीआरएटीमध्ये महापालिकेची बाजू मांडण्यासाठी प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे मोठे संकट जळगाव शहरावर आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या आदेशात कर्जाच्या रक्कमेवर हुडकोने दावा दाखल केलेल्या तारखेपासून १२ टक्के व्याज प्रतिवर्ष देण्याचेदेखील म्हटले होते....

फोटो - http://v.duta.us/ElwL-gAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/EcK0EQAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬