[kolhapur] - दौलत देसाईंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गेली वीस वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले शिक्षण प्रसारक मंडळाचे कौन्सिल मेंबर दौलत देसाई यांनी मंगळवारी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात दावेदारी केली. दरम्यान, आमदार पाटील यांनी, देसाई यांना पक्षात योग्य स्थान देत त्यांना बळ दिले जाईल, अशी ग्वाही दिली.

न्यू शाहूपुरी बेकर गल्ली येथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, महापालिका सभागृह नेता दिलीप पोवार, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील प्रमुख उपस्थित होते.

देसाई यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल आमदार पाटील म्हणाले, 'देसाई घराण्यातील काँग्रेसचे माजी आमदार एम. आर. देसाई, दत्ता बाळ, दिलीप देसाई, कुमार देसाई यांनी समाजासाठी योगदान दिले आहे. आध्यात्मिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक वारसा असलेल्या दौलत देसाई यांनी सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे. काँग्रेसने तीन राज्यांत घवघवीत यश मिळवले असून, पक्षाचे नेते राहुल गांधी सध्या विरोधी पक्षाची भूमिका जोरदारपणे मांडत आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, देसाईंसारख्या तरुण कार्यकर्त्याचे पक्षात स्वागत करण्यात मला आनंद होत आहे. योग्य सन्मान राखून पक्ष त्यांना बळ देईल.'...

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/vAy8AwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬