[kolhapur] - पीएफ चुकवला; कंपन्याकडून ४.५ कोटींची वसुली

  |   Kolhapurnews

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील दोन हजार कंपन्यांवर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारल्यानंतर संबंधित कंपन्यांनी साडेचार कोटींची रक्कम जमा केली. या कंपन्यांनी १२ कोटी ५६ लाख एवढी पीएफ रक्कम प्रॉव्हिडंट फंड खात्यात भरलीच नव्हती.

कोल्हापूर विभागात कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, सहकारी, खासगी संस्था आणि कारखान्यातील तीन लाख १४ हजार कर्मचारी पीएफ खातेदार आहेत. त्यापोटी दरमहा ४७ कोटी तर वर्षाला अंदाजे ५६४ कोटी रुपये जमा होतात. कमीत कमी २० कर्मचारी असलेल्या संस्थांसाठी पीएफ जमा करण्याचे बंधन आहे. मालक आणि कर्मचारी यांच्यात प्रत्येकी प्रत्येकी पन्नास टक्के पीएफची रक्कम असते. विभागात दहा हजार संस्थांची पीएफ ऑफिसकडे नोंदणी आहे. पैकी दोन हजार कंपन्यांनी २०१८ या वर्षात १२ कोटी ५६ लाख रुपये पीएफ भरला नव्हता. या कंपन्यांनी पीएफ रक्कमही कापून घेतली आहे. पण ती पीएफ खात्यावर भरली नाही. त्यासाठी नोटिसाही पाठवल्या होत्या. साखर उद्योग अडचणीत असल्याने कारखानदारांनी पीएफ भरला नव्हता. त्यामुळे कारखान्यांसाठी मुदतवाढ मिळाली....

फोटो - http://v.duta.us/sU_PbAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/9yB6ZgAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬