[mumbai] - किनारपट्टी १०० टक्के सुरक्षित !

  |   Mumbainews

संग्रहित फोटो घेता येतील

किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी

सर्वात मोठ्या समुद्री कवायती सुरू

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

किनारपट्टी १०० टक्के सुरक्षित असल्याची ग्वाही देणाऱ्या सर्वात मोठ्या समुद्री कवायती मंगळवारी देशाला लाभलेल्या प्रत्येक समुद्रात सुरू झाल्या. गुजरातपासून ते पश्चिम बंगालपर्यंत १३ राज्यांशी संबंधित समुद्रात एकाचवेळी या कवायती सुरू झाल्या आहेत. मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमानअंतर्गत १३ अत्याधुनिक युद्धनौकांसह एकूण १०० बोटी, विमाने व हेलिकॉप्टर यांचा अरबी समुद्रात थरार सुरू आहे. बुधवारी रात्री या कवायती संपतील.

२६/११ च्या हल्ल्याची नुकतीच दशकपूर्ती झाली. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी समुद्रातून घुसखोरी केली होती. त्यामुळेच देशाच्या ताब्यात असलेल्या समुद्रात वर्चस्व राखत समुद्र व पर्यायाने किनारपट्टी १०० टक्के सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नौदलावर सोपविण्यात आली. याच जबाबदारींतर्गत नौदलाकडून दर सहा महिन्यांनी संबंधित तळाच्या परिसरात तेथील तटरक्षक दल व राज्य सरकारांच्या सागरी पोलीसांच्या सहभागाने सुरक्षेसंबंधीच्या कवायती घेतल्या जातात. पण यंदा पहिल्यांदाच या कवायती एकाचवेळी सर्वत्र सुरू झाल्या आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/UaBoowAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬