[mumbai] - मुंबईत पार्किंगसाठी प्राधिकरण

  |   Mumbainews

प्राधिकरणाच्या निर्मितीसाठी समिती स्थापन

अतिरिक्त आयुक्तांची पार्किंग आयुक्त म्हणून नियुक्ती

सहपोलीस आयुक्त, परिवहन अधिकारी सदस्य

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेतर्फे स्वतंत्र पार्किंग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत तज्ज्ञ व तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार आहे. प्राधिकरणाच्या निर्मितीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून त्यात पार्किंग आयुक्त म्हणून पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली असून यात सहपोलिस आयुक्त (वाहतूक) व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य असणार आहेत.

मुंबईत पार्किंगचा प्रश्न खूप गंभीर असून सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत दक्षिण मुंबईत वाहन उभे करण्यासाठी पार्किंगासाठी जागा शिल्लक नसते. तीच स्थिती पूर्व व पश्चिम उपनगरात आहे. त्यामुळे फूटपथाच्या लगत अनेक वाहने उभी करण्यात येतात. परिणामी रस्त्यावर अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीचा मुंबईकरांना सामना करावा लागत आहे. यासाठी पालिकेने २०१४-३४च्या विकास आराखड्यात रस्त्यावरील पार्किंगचे व्यवस्थापन, सार्वजनिक पार्किंग, नियोजन व नियंत्रण करण्याकरिता पालिका स्तरावर पार्किंग प्राधिकरण स्थापन करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार पार्किंग प्राधिकरण स्थापन करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/4mekiwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬