[mumbai] - युतीसाठी ‘स्मारक’मध्य!

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

गेल्या काही दिवसांपासून भाजप-शिवसेना युतीत आलेला दुरावा दूर करण्याचे 'निर्णायक' प्रयत्न सुरू झाल्याचे संकेत मंगळवारी दिसून आले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानाच्या जागेवर स्मारक उभारण्यात येणार असून, त्यासाठी १०० कोटी रुपयांचा खर्च करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी शिवसेना किती महत्त्वाची आहे, याचेही संकेत बाळासाहेबांच्या जयंतीच्या (२३ जानेवारी) पूर्वसंध्येला हा महत्त्वाचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीचा निर्णय अधांतरीच आहे. लोकसभेसाठी शिवसेनेसोबत युती करणे हे केंद्रातील भाजपसाठी महत्त्वाची असले तरी शिवसेनेला त्यापेक्षा राज्यात विधानसभेसाठी भाजपकडून निम्म्या जागा लढवण्यास मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या दोन्हींतील सुवर्णमध्य साधण्याचे प्रयत्न सध्या दोन्ही पक्षांचे नेते पडद्याआडून करत आहेत. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्याला विशेष महत्त्व आहे. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक हे शिवसैनिकांसाठी अत्यंत श्रद्धेचा विषय असून, या स्मारकाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी चिरंतर राहाव्यात यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. त्यासाठीच स्मारकाच्या कामाचा शिवसेनेचे मंत्री सातत्याने पाठपुरावा करीत असून, त्यालाच मंगळवारी यश आल्याचे बोलले जात आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ZwN2SAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬