[mumbai] - विदर्भात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

पूर्व विदर्भात २४ ते २६ जानेवारी दरम्यान वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. परिणामी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावे. तसेच शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा, असे आवाहन राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ढगाळी वातावरणामुळे विदर्भातील कमाल तापमान कमी २९ जानेवारीपर्यंत सरासरीपेक्षा कमी राहील. वाढलेल्या आर्द्रतेमुळे २५ ते २७ जानेवारी या काळात काही प्रमाणात धुके पडेल. याच काळात मराठवाड्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहील आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागात हलक्या पावसाची शक्यता राहील....

फोटो - http://v.duta.us/1f6-_QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ZY_IogAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬