[mumbai] - sena bjp alliance?: युतीसाठी खासदारांचा उद्धव यांच्यावर दबाव

  |   Mumbainews

मुंबई

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे संबंध ताणले गेले असले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका करत असले, तरी देखील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन पक्षांची युती होणं अत्यंत गरजेचे असल्याचे शिवसेनेच्या खासदारांना वाटू लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर युतीसाठी खासदारांचा दबाव वाढत असून अनेक खासदारांनी आपले म्हणणे उद्धव यांना फोनद्वारे कळवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे सर्व १८ खासदार आणि फडणवीस सरकारमधील सेनेचे ४ मंत्री देखील युतीसाठी आग्रही आहेत.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही युतीसाठी अनुकुलता दाखवली असून युती झाल्यास लोकसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने खासदार निवडून येतील असा विश्वास राऊत यांनी 'टीव्ही १८' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मात्र, युतीबाबत अनुकुलता दाखवताना, भाजपनं नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री बनवले, तर शिवसेना त्यांना पाठिंबा देईल, असं सूचक वक्तव्यही राऊत यांनी केले आहे. भाजप हा केवळ स्वत:चाच विचार करतो, त्यामुळे आम्ही देखील आमचाच विचार करत आहोत, असंही राऊत म्हणाले....

फोटो - http://v.duta.us/JGpjxQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/S5gUTwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬