[nagpur] - डिजीटल अभ्यासक्रमांकरिता आयआयएमसीचे सेंटर फॉर एक्सलन्स

  |   Nagpurnews

म.टा.प्रतिनिधी, नागपूर

प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात आमुलाग्र बदल घडत आहेत. वृत्तपत्र, टीव्ही यांच्या पुढे जाऊन आता डिजीटल माध्यमांचे युग आहे. त्यामुळे येणारा काळ हा डिजीटल माध्यमांचाच असून या क्षेत्राला अशाच मनुष्यबळाची आवश्यकता भासणार नाही. नेमकी ही बाब लक्षात घेऊन इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मास कम्युनिकेशनने (आयआयएमसी) नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर अॅनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्टस अॅन्ड कॉमिक्स सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२० पर्यंत या सेंटरला सुरुवात होणार असून या प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी आशिया खंडातील सर्वात मोठे सेंटर ठरणार असल्याची माहिती आयआटीएमसीचे महासंचालक के.जी. सुरेश यांनी दिली.

आयआयएमसीच्या पश्चिम विभागातील अमरावती केंद्राला भेट दिल्यानंतर नागपूर भेटीवर आलेल्या सुरेश यांनी आयआयएमसीच्या भविष्यातील विविध योजनांबद्दल माहिती दिली. सेंटर ऑफ एक्सलन्स बद्दल अधिक बोलताना सुरेश म्हणाले, माध्यमांच्या क्षेत्रात अलीकडच्या काळात आमुलाग्र बदल होत आहेत. माध्यमांमध्ये डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. अॅनिमेशन, व्हीएफएक्स यासारख्या तंत्रज्ञानाला वाढती मागणी आहे. नेमकी हीच गरज ओळखून आयआयएमसीने सेंटर फॉर एक्सलन्स सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबईत गोरेगाव येथे जागा घेण्यात आली असून या ठिकाणी उभारण्यात येणारे केंद्र हे अत्यंत अद्ययावत असेल. विशेष म्हणजे या केंद्रातून दरवर्षी १६०० प्रशिक्षित विद्यार्थी बाहेर पडतील. जेणेकरून एक उत्तम तंत्रज्ञांचे मनुष्यबळ या क्षेत्रातील कंपन्यांना उपलब्ध होईल. या केंद्राला २०२०-२१ या कालावधीत सुरुवात होईल असेही सुरेश यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी आयआयएमसीच्या अमरावती केंद्राचे संचालक व ज्येष्ठ पत्रकार विजय सातोकर, नागपूर पत्रकार क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/m-sV0AAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬