[nagpur] - मेडिट्रिनात कोट्यवधींचा घोटाळा

  |   Nagpurnews

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

शासनाच्या आरोग्यदायी योजना राबविताना, रुग्णांकडूनही पैसे घ्यायचे, त्यालाच लाभार्थी दाखवून सरकारी अनुदान लाटायचे, असा धक्कादायक प्रकार केल्याच्या आरोपावरून रामदासपेठेतील मेडिट्रीना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर पालतेवार यांच्याविरोधात सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पालतेवारांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याची तक्रार त्यांचेच भागीदार गणेश चक्करवार यांनी केली होती. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश चक्करवार हे प्राप्तिकर सल्लागार आहेत. डिसेंबर २००६ मध्ये चक्करवार व डॉ. पालतेवार यांच्यासह अन्य काही व्यावसायिकांनी व्हीआरजी हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली होती. व्हीआरजीने १९ फेब्रुवारी २०१२मध्ये रामदासपेठेत मेडिट्रिना इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स नावाचे सुस्सजित हॉस्पिटल सुरू केले. यादरम्यान राजीव गांधी जीवनदायी योजना (सध्याची महात्मा फुले जीवनदायी योजना), वेकोलिची आरोग्य योजना, केंद्र सरकारच्या विविध आरोग्य योजना तसेच मध्यप्रदेश दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींसाठीच्या आरोग्य योजनांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करणारया रुग्णालयांच्या यादीत मेडिट्रिनाचा समावेश करण्यात आला होता. डॉ. पालतेवार हे डॉक्टर असल्याने अन्य भागीदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून संपूर्ण कारभार सोपविला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/jCrX4QAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬