[nagpur] - मन:शांतीसाठी आहे ते स्वीकारा!

  |   Nagpurnews

म. टा. प्रतिनिधी, नागपूर :

‘आपल्या आयुष्यात दिवसभरात अनेक घटना घडत असतात. काही मनासारख्या तर काही मनाविरूद्ध असतात. मनाविरूद्ध झाल्या की मन:शांती बिघडते. समोर जी परिस्थिती आहे ती स्वीकारली तर भावनिक स्वास्थ्य वाढवले जाऊ शकते’, असे मन:शांतीचे सूत्र ब्रम्हकुमारी शिवानी यांनी सांगितले.

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठातर्फे ब्रह्मकुमारी शिवानी यांचे व्याख्यान मंगळवारी जामठा येथील विश्वशांती सरोवर येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिवानी यांनी ‘इमोशनल फिटनेस’ विषयावर भाष्य केले. या कार्यक्रमात ब्रम्हकुमारी शिवानी यांचे नृत्याद्वारे स्वागत करण्यात आले. प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यापीठाच्या नागपूर केंद्राच्या प्रमुख पुष्पा दिदी यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या कार्याचा परिचय निलिमा दिदी यांनी करून दिला.

आपले मन जेव्हा समोरची परिस्थिती आणि लोकांच्या वागण्यावर अवलंबून असते तेव्हा ते वारंवार दु:खी होते. समोरच्याकडून अपेक्षा असल्या की त्रास होतो. आपण लोकांनी बदलावे अशी वाट बघत असतो. पण आपल्या भावनिक स्वास्थ नीट ठेवायचे असेल तर आपल्यालाच बदलावे लागते. अपेक्षा करण्यापेक्षा जे आहे ते स्वीकारले तर आपल्याला त्रास कमी होतो’,असे ब्रम्हकुमारी शिवानी म्हणाल्या....

फोटो - http://v.duta.us/nPMxlAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/I3fRyAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬