[nagpur] - शहर काँग्रेसचे दिल्लीत लॉबिंग

  |   Nagpurnews

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

संघटनात्मक फेरबदल टळावे आणि असंतुष्ट गटाला उमेदवारी मिळू नये यासाठी दिल्लीत लॉबिंग करण्यासाठी गेलेल्या नेत्यांनी दुसऱ्या दिवशीही बड्या नेत्यांची भेट घेऊन शहरातील स्थितीकडे लक्ष वेधले.

शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ९० नेते, पदाधिकारी दोन दिवसांपासून दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटत आहेत. उमेदवार निश्चित करताना शहर काँग्रेसला विश्वासात घ्यावे, वरून उमेदवार लादू नये, अशी भूमिका मांडण्यात येत आहे. केंद्रीय समितीच्या सूचनेनुसार शहर काँग्रेसकडे आलेल्या अर्जांचाच विचार करण्यात यावा, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्याचप्रमाणे विलास मुत्तेमवार यांच्या उमेदवारीसाठी त्यांचे समर्थक आघाडीवर असल्याची चर्चा आहे. तसेच, पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना परत पक्षात घेऊ नये, यासाठीदेखील त्यांचे विरोधक सक्रिय असल्याचे समजते....

फोटो - http://v.duta.us/LSfOgQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/IDL7LgAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬