[nashik] - असाही निषेध! CMना पाठविले घुंगराचे चाळ

  |   Nashiknews

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डान्सबारवरील बंदी उठविण्याच्या निर्णयाचा संभाजी ब्रिगेडने निषेध नोंदविला असून, मुख्यमंत्री फडणवीस यांना घुंगराचा चाळ निषेधात्मक भेट म्हणून पाठविला आहे. अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर तो चाळ सोपवून डान्सबार बंदी कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली.

सरकारच्या हलगर्जीपणामुळे डान्सबार बंदी उठविण्यात आल्याचा निषेध महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ, जिल्हा सचिव नितीन रोठे पाटील यांसह शिष्टमंडळाने सागर यांच्याकडे नोंदविला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागुन सरकार सत्तेवर आले. परंतु, त्याच छत्रपतींच्या परस्त्री मातेसमान या विचारांचा सरकार अवमान करीत डान्स बान्स सुरू केल्याने महिलांविषयी सरकारची मानसिकता लक्षात येते. डान्सबारवरील बंदी उठवल्यामुळे अनेक धनदांडग्यांचे डान्स बार चालू होऊन तरुणवर्ग व्यसनाधीन होईल, अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे. सरकारने डान्सबार बंदी कायम ठेवण्यासाठी वटहुकूम आणावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा नीलेश काळे, हर्षल पवार, युवराज गुळवे, युवराज पवार, अभिषेक चिपाडे, सनी ठाकरे, मयूर पठाडे आदींनी केला आहे....

फोटो - http://v.duta.us/UZqlzAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/yf2s9QAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬