[nashik] - ..तर मिळू शकते दुसरी ‘राजधानी एक्स्प्रेस’!

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्य रेल्वे मार्गावरुन नाशिकमार्गे नुकतीच राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. मात्र, गेल्या साडेपाच वर्षांपासून धावत असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेसला राजधानी एक्स्प्रेसचा दर्जा मिळावा, अशी मागणी नाशिककरांकडून पुढे येऊ लागली आहे. या गाडीला राजधानी एक्स्प्रेसचा दर्जा मिळाल्यास नाशिकसह जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना दिल्ली गाठणे आणखी सुकर होणार आहे.

आजवर नाशिककरांसह उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना दिल्ली गाठण्यासाठी राजधानी एक्स्प्रेस उपलब्ध नव्हती. ही गाडी पकडण्यासाठी नाशिककरांना प्रथम मुंबई गाठावी लागत असे. ही अडचण ओळखून खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिकमार्गे नुकतीच राजधानी एक्स्प्रेस सुरू झाली आहे. नाशिकमार्गे दिल्लीसाठी राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याची नाशिककरांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. त्यामुळे ऑक्टोबर २०१३ मध्ये तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी शरद पवार यांच्या माध्यमातून तत्कालीन रेल्वेमंत्र्यांकडे नाशिककरांची ही मागणी मांडून पाठपुरावाही केला होता. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर लोकमान्य टिळक टर्मिनस हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस ही गाडी सुरू करण्यात आली होती. या गाडीला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याने ती रेल्वे मंत्रालयाने पुढे कायम केली. गेल्या साडेपाच वर्षांपासून ही गाडी प्रवाशांना चांगली सेवा देत आहे. या गाडीलाही राजधानीचेच डबे आहेत. नव्याने नाशिकमार्गे सुरू झालेल्या राजधानी एक्स्प्रेसप्रमाणेच या गाडीलाही वेळ लागतो. केवळ जळगावऐवजी भुसावळला या जुन्या गाडीला थांबा आहे. त्यामुळे या गाडीलाही राजधानीचा दर्जा दिल्यास उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना दिल्ली गाठण्यासाठी दोन राजधानी एक्स्प्रेसची सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी मागणी नाशिककरांकडून पुढे आली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/OCp_iAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬