[nashik] - महापालिकेच्या बजेटवर यंदा बोजा

  |   Nashiknews

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत यंदा भांडवली खर्च जास्त असल्याने बजेटवर बोजा पडणार आहे. महापालिकेकडून होणाऱ्या करवाढीबाबत निर्णय होत नसल्याने यंदा खर्च जास्त व उत्पन्न कमी, असे चित्र राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे खर्च कसा भागवायचा, या विवंचनेत प्रशासन आहे.

यंदा बहुचर्चित परिवहन सेवा प्रत्यक्षात येणार आहे. या योजनेसाठी मुख्यमंत्री आग्रही असल्याने येत्या काही दिवसांत ती कार्यान्वित होईल. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च होणार आहे. बस डेपोसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना सातवा आयोग लागू केला. १ जानेवारी २०१६ पासून फरक देण्याचे कबूल केले आहे. राज्य सरकारनेदेखील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी घोषणा नगरविकास खाते करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा भारही महापालिकेवर पडणार आहे. गेल्या वर्षी नगरसेवक निधीला कात्री लावण्यात तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यशस्वी ठरले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्चात बचत झाली होती. मात्र, नगरसेवकांचा निधी पुन्हा सुरू झाल्याने काही कोटींचा बोजा महापालिकेवर पडत आहे. काही कामे आधी मंजूर झाली आहेत. त्याचे बीलही अदा करावे लागणार आहे. काही मोठी कामे प्रस्तावित आहेत. शिवाजी गार्डनचे साडेचार कोटींचे काम होणार आहे. त्यासाठी दीड कोटी महापालिकेला खर्च करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे गोल्फ क्लबचेही काम करण्यात येणार आहे. त्याचाही बोजा नाशिक महापालिकेवर पडणार आहे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांत महापालिकेच्या दादासाहेब फाळके स्मारकाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे कामांचा आकडा वाढता आहे. पर्यायाने, यंदाच्या बजेटवर मोठ्या प्रमाणात भार पडण्याची शक्यता आहे. खर्चावर मर्यादा आणल्याने महापालिकेवर असलेले ११७ कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यात आले होते. त्यामुळे नाशिक महापालिका कर्जमुक्त झाली होती. यंदा करवाढीला मान्यता न मिळाल्याने उत्पन्न कमी व खर्च जास्त, अशी परिस्थिती उद्भवणार आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Y_n-UQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬