[navi-mumbai] - किनारपट्टीच्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रस्ताव

  |   Navi-Mumbainews

खासविकास मंत्री दिवाकर रावते यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

समुद्रकिनारपट्टीच्या भागातील शेती तसेच पिकांचे समुद्राच्या उधाणामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे आणि कांदळवनामुळे बाधित झालेल्या शेतजमिनींच्या बदल्यात पर्यायी जमीन देण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत मान्यता दिल्याची माहिती परिवहन व खारविकास मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी येथे दिली.

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वरील प्रस्तावाबाबत निर्णय घेण्याची विनंती केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावास तत्वत: मान्यता दिली आहे. याबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिल्या आहेत. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही याबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत आग्रही भूमिका मांडली, असे रावते यांनी सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/L0tucwAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬