[navi-mumbai] - 'गगन' मुळे नाईट लँडिंगचे होईल 'उडान'-सुधारित बातमी

  |   Navi-Mumbainews

@ChinmaykaleMT

'गगन' मुळे नाईट लँडिंगचे होईल 'उडान'

मुंबई: नाईट लँडिंगची सोय उपलब्ध झाल्यास 'उडान' अंतर्गत कार्यरत असलेल्या विमानतळावरून प्रवाशांना रात्रीदेखील प्रवास करता येणार आहे. यासाठी उपग्रहाच्या आधारे वैमानिकाना मार्ग दाखविणारी 'गगन' प्रणाली अत्यन्त उपयुक्त असेल. विमान 'गगन' उपकरणाने सज्ज असल्यास थेट उपग्रहाचा आधार घेत त्या विमानतळांवर नाईट लॅण्डिंग शक्य होणार आहे. ही उपकरणे बसविण्यासाठी विमानांना आता ३० जून २०२० पर्यंतची मुदत मिळाली आहे.

नियंत्रण कक्ष किंवा नेव्हिगेशनशी निगडित प्रणाली नसलेली विमानतळे 'उडान'अंतर्गत मुख्य प्रवाहात आणली जात आहेत. देशभरातील २००हून विमानतळांवर हवाई नियंत्रण कक्ष किंवा नेव्हिगेशनशी संबंधित कुठलीही प्रणाली नाही. महाराष्ट्रातही 'उडान'साठी प्रस्तावित असलेली १२ पैकी १० विमानतळे याच श्रेणीतील आहेत. अशा विमानतळांवर विमानांना खाली उतरण्यासाठी किंवा उड्डाणासाठी मार्गदर्शन करणारी सोय नसल्यास वैमानिकांना 'गगन' प्रणालीद्वारे उपग्रहाचा आधार घेता येतो. ही प्रणाली भारतीय विमानतळ प्राधिकरण व इस्रोने तयार केली आहे. पण वैमानिकांना या प्रणालीचा लाभ घेण्यासाठी विमानांनाही त्यासंबंधी उपकरण बसिवण्याची गरज आहे. ही उपकरणे बसिवण्यासाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सर्व विमानसेवा कंपन्यांना आधी ३१ डिसेंबर २०१८ ची मुदत दिली होती. पण कंपन्यांच्या आग्रहामुळे आता डीजीसीएने त्यांना ३० जून २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/DRf97QAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬