[navi-mumbai] - दहावीच्या विद्यार्थ्याचा लोकलगाडीखाली मृत्यू

  |   Navi-Mumbainews

नवी मुंबई : दहावीत शिक्षण घेणाऱ्या अमरिश यादव (१७) या तरुणाचा मृतदेह सोमवारी रात्री नऊच्या सुमारास खारघर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळालगत आढळून आला. या तरुणाची मोटारसायकल त्याच ठिकाणी काही अंतरावर उभी आढळून आली. या तरुणाने स्वत:ला लोकलखाली झोकून देत आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

अमरिश हा तळोजा येथील नावडे परिसरात रहात होता. सोमवारी दुपारी तीन वाजता तो रोडपाली येथे खासगी क्लासेसला जाण्याच्या बहाण्याने वडिलांची मोटारसायकल घेऊन गेला. मात्र त्यानंतर तो रात्री घरी परतलाच नाही. त्यामुळे अमरिशच्या वडिलांनी त्याचा शोध घेतला असता, तो क्लासमध्ये गेला नसल्याचे कळले. त्यामुळे अमरिशच्या वडिलांनी कळंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या दरम्यान, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुंडके धडावेगळे झालेला अमरिशचा मृतदेह खारघर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळालगत आढळून आला. पनवेल रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अकरावीत शिकणाऱ्या एका तरुणाने लोकलखाली आत्महत्या केली होती.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/J4-OeAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬