[navi-mumbai] - सीईटीपी मंडळाच्या बरखास्तीला स्थगिती

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, पनवेल

तळोजातील उद्योजकांच्या सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या बरखास्तीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. पनवेल सहाय्यक निबंधकांनी १० जानेवारी रोजी दिलेल्या संचालक मंडळ बरखास्तीच्या आदेशाला कोकण विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेकडे आव्हान देण्यात आल्यानंतर त्यांनी हे आदेश दिले.

भारिपचे पनवेल विधानसभा अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या पाठपुराव्यामुळे पनवेलचे सहाय्यक निबंधक चेतन चौधरी यांनी सीईटीपी संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. महादेव वाघमारे यांनी केलेल्या आरोपाचा खुलासा मागितल्यानंतर संचालक मंडळाच्या कारभारावर संशय व्यक्त केला होता. मात्र चौकशीत कर्तव्यात कसूर केले असल्याचे लेखी पत्रात नमूद केले होते. तसेच, संचालक मंडळाला त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी सांगूनही वेळेत म्हणणे सादर करण्यात आले नव्हते. शिवाय सीईटीपी मंडळावर सहाय्यक निबंधकांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत महादेव वाघमारे यांनी उपोषण केल्यानंतर कारवाई करण्यात आली. संचालक मंडळ बरखास्त करून सीईटीपीवर प्रशासक म्हणून नीता पुगावकर यांची नियुक्ती करण्यात आली. पनवेल सहाय्यक निबंधकांनी दिलेल्या आदेशाला १० दिवस पूर्ण होत नाहीत तोच संचालक मंडळाची बरखास्ती कोकण विभागीय सहनिबंधकांनी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. संचालक मंडळावर करण्यात आलेली स्थगिती अन्यायकारक असल्यामुळे स्थगिती उठवावी म्हणून सीईटीपीचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती लाटकर यांच्याकडे केली होती. या प्रकरणात १८ जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात आली होती. सीईटीपीचे वकील लीना पाटील यांनी विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती लाटकर यांच्या समोर, युक्तिवाद सादर करत सहाय्यक निबंधक यांनी प्रस्तुत प्रकरणात बेकायदा संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश पारित केले असून कलम ८९ अ अन्वये संस्थेस नोटीस न देता तपासणी घेतली. हा तपासणी अहवाल संस्थेस उपलब्ध करून दिला नाही. तसेच, क्रिस्टल कंपनीत दिलेले कामाचे आदेश ऑक्टोबर २०१८मध्ये संपुष्टात आले आहेत, असा युक्तिवाद करण्यात आला. सीईटीपीच्या संचालक मंडळाचे म्हणणे ऐकून न घेता पनवेलच्या सहाय्यक निबंधकांनी आमच्यावर थेट बरखास्तीची कारवाई केली. ही कारवाई योग्य नसून कोणाच्या तरी दबावाखाली येऊन ही कारवाई केली असल्याचा आरोप संचालक मंडळांनी केला होता. त्यामुळे संचालक मंडळावर केलेल्या बरखास्तीला स्थिगिती देऊन तात्पुरत्या स्वरूपात सीईटीपीचा कारभार चालविण्यास मुभा देण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० मार्च रोजी दुपारी ठेवण्यात आली असल्यामुळे बरखास्त केलेल्या सीईटीपी मंडळाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/vmKJhgAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬