[navi-mumbai] - २२ जानेवारी २०१९ / थोडक्यात

  |   Navi-Mumbainews

प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

भाईंदर - भवन्स महाविद्यालयातर्फे प्रथमच आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी खेळ उत्सव २०१८-१९ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण १६ महाविद्यालयांनी या स्पर्धेत भाग घेतला. अंतिम सामन्यात भाईंदरच्या शंकर नारायण महाविद्यालयाने उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर पनवेल येथील सीकेटी महाविद्यालयाच्या संघास पराभूत करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. भवन्स महाविद्यालयाच्या प्राचार्यातर्फे प्रमाणपत्र व चषक देऊन खेळाडूंना गौरविण्यात आले. शंकर नारायण महाविद्यालयातील हितेश म्हात्रे व किरण पडवळे यांनी स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू व उत्कृष्ट गोलंदाज ही पारितोषिके पटकावली. या यशाबद्दल शंकर नारायण शिक्षण संस्थेचे संस्थापक रोहिदास पाटील, सचिव महेश म्हात्रे व प्राचार्य यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

पंजाबी-मराठी एकतेचा संदेश...

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/u3Rt_gAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬