[pune] - अभिरूप न्यायालय स्पर्धेतराजदीप व काजल प्रथम

  |   Punenews

मॉडर्न विधी महाविद्यालय व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने १३व्या शंकरराव कानिटकर राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. दुर्गाम्बिनी पटेल यांनी केले. अभिरूप न्यायालय स्पर्धा ही विद्यार्थांसाठी एक उत्तम संधी आहे. त्यामुळे वक्तृत्व, दावा दाखल करण्यासाठी आवश्यक संशोधन, न्यायालयातील विशिष्ट आचरण, वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा प्रयोग आदींचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. या स्पर्धेसाठी देशातील विविध विधी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस राजदीप मंथन आणि काजल गुप्ता (डॉ. आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमी, नागपूर), द्वितीय बक्षीस शिवशंकर आणि मधुमिता सी. (सास्त्रा विद्यापीठ, तमिळनाडू) आणि उत्कृष्ट वकील सिद्धी नाईक (वि. म. साळगावकर विधी महाविद्यालय, गोवा) यांना देण्यात आले. प्रोत्साहनपूर्वक पारितोषिक ईशान अग्रवाल (बेनेट विद्यापीठ, नॉएडा) व अनिरुद्ध आर. एस. (क्राइस्ट विद्यापीठ, बेंगळुरू) यांना देऊन गौरवण्यात आले. लायब्ररी बेस्ट युजर्स म्हणून दीपिका युके, सौरभ साठे आणि आशुतोष काळे यांना गौरवण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. पवन कलवाला व प्रा. शीतल केसकर यांनी विशेष प्रयत्न केले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/X94ODAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬