[pune] - ‘आयुष्यमान भारत’च्या अंमलबजावणीचा आढावा

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना सर्वप्रकारच्या आजारांवर उपचार मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या 'आयुष्मान भारत' योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेकडून कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी राव यांनी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

शहरातील सुमारे एक लाख ४३ हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याची यादी महापालिकेच्या आरोग्य विभागाला उपलब्ध झाली असून, प्रभागनिहाय यादीची विभागणी करण्यात येणार आहे. त्यानंतर क्षेत्रिय अधिकारी, प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक यांच्या उपस्थितीत क्षेत्रिय कार्यालयानुसार बैठका घेण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रभागनिहाय योजनेच्या कार्डाचे वाटप करण्यात येणार आहे. हा सर्व उपक्रम १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष जनजागृती मोहीम राबविणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/EpLUMAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬