[pune] - पदवीधारकांना संधी देण्याची मागणी

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण विभाग कनिष्ठ अभियंता (गट 'ब' अराजपत्रित) या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधारकांना संधी द्यावी आणि कालबाह्य असलेली १९९८ ची अधिसूचना रद्द करावी. मृदा व जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी गट 'ब', सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता गट 'ब' य़ा पदासाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीला मुदतवाढ द्यावी, अशा मागण्यांसाठी पदवीधारक स्थापत्य अभियंत्यांनी मंगळवारपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या मेगाभरतीत सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण विभागाच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट 'ब' या पदाचा समावेश आहे. या तिन्ही विभागांमध्ये एकूण २१५७ पदांची भरती करण्यात येणार आहे. सरकारने १९९८ सालामध्ये केलेल्या नियमामुळे या पदासाठी केवळ पदविकाधारक उमेदवारांना अर्ज करता येत असून, हजारो स्थापत्य पदवीधारक अभियंते मुकणार आहे. याबाबत मुंबईतील आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करण्यात आले आणि संबंधित विभागाचे सचिव व मंत्र्यांना निवेदन देण्यात आले, मात्र कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान, या उपोषणाला 'एमपीएससी स्टुडन्ट राइट्स' आणि स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेने पाठिंबा दिला असून, पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/JssNwwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬