[pune] - बंडोबांना मुख्यमंत्र्यांची पाच कोटींची बक्षिसी

  |   Punenews

म. टा. वृत्तसेवा, नांदेड

महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड करताना, पक्षाविरोधात बंड करणाऱ्या भाजपच्या पाच नगरसेवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पक्षाचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या आणि वरिष्ठांकडून सातत्याने आवाहन करूनही, हायकोर्टातील याचिका कायम ठेवणाऱ्या नगरसेवकांनाच मुख्यमंत्र्यांकडून विशेष निधी देण्यात आला आहे. त्यामुळे, भाजपच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या निमित्ताने भाजपमधील निष्ठावंत व उपऱ्यांचा वाद ऐरणीवर आला आहे.

नांदेड महापालिकेच्या सुमारे १६ महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपने मोठी प्रतिष्ठा पणाला लावून निवडणूक लढविली होती. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री निवडणुकीदरम्यान नांदेडला तळ ठोकून होते. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीला विशेष लक्ष दिले होते. भाजपने मोठी प्रचार यंत्रणा राबवली, मात्र, पक्षाचे केवळ सहा नगरसेवक निवडून आले. शिवसेनेचा तर एकमेव नगरसेवक कमी मताधिक्याने निवडुण आला. सर्व राजकीय विश्‍लेषकाचे अंदाज मोडत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. काँग्रेसचे ७३ नगरसेवक या निवडणुकीत विजय झाले....

फोटो - http://v.duta.us/jPwnOgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2d1mMQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬