[pune] - बापट यांच्याविरोधातकाँग्रेस अण्णांच्या भेटीला

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या एका खटल्यात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावर ताशेरे ओढल्याप्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. तर, हजारे यांनीही या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन दिल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. देश हुकूमशाहीकडे चालला असल्याची टिप्पणी हजारे यांनी या भेटीदरम्यान केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बालगुडे यांनी केला आहे.

बापट यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आक्रमक भूमिका घेऊन टीकेचा सूर आळवला आहे. बापट यांनी राजीनामा द्यावा आणि कोर्टाने दखल घेतलेल्या प्रकरणाची चौकशी व्हावी या मागणीसाठी बालगुडे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने हजारे यांची राळेगण सिद्धी येथे भेट घेतली. हजारे यांनी या प्रकरणी लक्ष घालून हे प्रकरण तडीस न्यावे, अशी इच्छा काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे व्यक्त केली. तर, हजारे यांनीही या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करणार असल्याचे आश्वासन दिले आहे, असे बालगुडे म्हणाले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/eNhP1gAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬