[pune] - ‘बालगंधर्व’ पुनर्रचनेसाठी२६ प्रस्ताव सादर

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्रचनेमध्ये पन्नासहून अधिक वास्तुविशारदांनी (आर्किटेक्ट) स्वारस्य दाखवले असले, तरी प्रत्यक्षात २६ जणांनीच त्यासंदर्भातील अंतिम प्रस्ताव पालिकेला सादर केला आहे. या सर्व प्रस्तावांची छाननी करण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत तज्ज्ञ समिती नियुक्त केली जाणार आहे. या समितीमार्फतच सर्व प्रस्तावांची छाननी केली जाणार असून, त्यातून कोणता प्रस्ताव स्वीकारायचा, याची शिफारस करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या २०१८-१९ च्या अर्थसंकल्पामध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्रचनेची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेचे स्वागत करण्याप्रमाणे त्याला विविध घटकांकडून जोरदार विरोध झाला. अस्तित्वातील रंगमंदिराची इमारत कायम ठेवून उर्वरित भागांत कोणत्या सुधारणा करता येतील अथवा पुनर्रचना करताना इमारत पाडूनच नव्याने रंगमंदिर आणि आसपासच्या परिसराचा आराखडा कसा असेल, याबाबत पालिकेने आर्किटेक्टकडून प्रस्ताव मागविले होते. त्यासाठी पुण्यासह मुंबई आणि राज्यातील इतर भागांतील पन्नासहून अधिक आर्किटेक्टनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या आर्किटेक्टना प्रस्ताव सादर करण्यासाठी सोमवारपर्यंतची (दि. २१) मुदत देण्यात आली होती. या कालावधीत पालिकेकडे २६ प्रस्ताव दाखल झाले आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/TpcaFQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬