[pune] - विशेष मुलांच्या शाळेततीळगूळ समारंभ साजरा

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे : अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एनएनएस विभागातर्फे अंबटवेट (ता. मुळशी) येथील संस्कार प्रतिष्ठानच्या विशेष मुलांच्या निवासी शाळेत सलग १०व्या वर्षी सदिच्छा भेट देऊन तीळगूळ समारंभ साजरा केला. या वेळी तेथील मुलांशी प्रेमाने हितगुज करून त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य खुलवले. या वेळी मृणाली बावडेकर ,गौरी अवसरे, श्रावणी पाटेकर, गणेश डांगी, प्रथमेश शेलार, आनंद जांगडा यांनी तीळगूळ आणि फळवाटप केले. एनएनएसचे कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे यांनी उपक्रम राबवला.

जयंती उत्साहात साजरी

पुणे : अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील ठाकरे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा. गणेश कोंढाळकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्राचार्य ठाकरे, विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा. गणेश कोंढाळकर, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणी विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल प्रा. तानाजी माळी यांनी केले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/hzXtVwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬