[pune] - शनिवारवाडा @ २८७!

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

छत्रपती शिवाजी महाराजांच्यानंतर हिंदवी स्वराज्याची पताका ज्या पेशवाईने अटकेपार जात फडकावत ठेवली, अशा पेशवाईचे आणि मराठा साम्राज्याच्या एकेकाळच्या वैभवाचे प्रतीक असणाऱ्या शनिवारवाड्याचा परिसर मंगळवारी गजबजून गेला होता. त्याला कारणही तसेच होते, वाड्याच्या भक्कम तटबंदीसोबत एखाद्या काळ्या कातळाप्रमाणे वर्षानुवर्षे स्वराज्यरक्षण करत उभा असलेला दिल्ली दरवाजा आज वाड्याच्या वाढदिवसानिमित्त उघडण्यात आला होता. एरवी पूर्ण उघडला जात नसणारा हा दिल्ली दरवाजा वर्षातून एकदाच उघडण्यात येत असल्यामुळे अनेकजण वाड्यात आवर्जून आले होते. दरवाजा उघडला गेला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात एकच जल्लोष करत मराठ्यांच्या पराक्रमाला सलाम केला.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे आयोजित या कार्यक्रमात शनिवारवाड्याचा २८७ वा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात आला. २२ जानेवारी १७३२ ते २२ जानेवारी २०१९ एवढा दीर्घ काळ ज्याने अनुभवला त्या शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा या वेळी पूर्णपणे उघडण्यात आला. या वेळी इतिहासतज्ज्ञ मोहन शेटे, पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), कुंदनकुमार साठे, अनिल नेने आदी उपस्थित होते. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजनदेखील करण्यात आले. कार्यक्रमाचे यंदा सहावे वर्ष होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fFBFMQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬