[satara] - ४२ गावांना कर्नाटकातून पाणी

  |   Sataranews

सांगली:

जत तालुक्‍यातील पूर्व भागातील वंचित गावांना कर्नाटक राज्‍याच्‍या तुबची-बबलेश्‍वर उपसा सिंचन योजनेमधून पाणी देणेबाबत पुर्णतः कर्नाटक शासन सहकार्य करणार आहे. अशी माहिती माजी केंद्रीय राज्‍यमंत्री प्रतिक पाटील यांनी दिली. नुकतेच कर्नाटक राज्‍याचे कॉंग्रेसचे आरोग्‍य मंत्री शिवानंद पाटील यांचे बरोबर कर्नाटक राज्‍याचे कॉंग्रेसचे पाटबंधारे मंत्री डी.के. शिवकुमार बेंगलोर मध्‍ये भेट घेवून चर्चा केली.

महाराष्‍ट्र कर्नाटक सीमावर्ती जलसिंचन योजनेचा नकाशा समोर ठेवून सखोल चर्चा करण्‍यात आली. कर्नाटक शासनाकडून या योजनेची सखोल माहिती घेवून उच्‍चस्‍तरीय पाटबंधारे अधिकारी यांचे बरोबर ताबडतोब चर्चा करुन जत तालुक्‍यातील वंचित 42 गावांना तुबची – बबलेश्‍वर योजनेमधून पाणी देणेस सहकार्य करु असे आश्‍वासन पाटबंधारे मंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिले. तिकोटा (जि. विजापूर) येथील वितरण हौदातून बोर नदीतून प्रवाही पद्धतीने पाणी आणणे शक्य आहे, अशा माहिती प्रतिक पाटील यांनी दिली.

फोटो - http://v.duta.us/5Rgw4gAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/D42o9wAA

📲 Get Satara News on Whatsapp 💬