[thane] - आदिवासी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पदकांवर मोहोर

  |   Thanenews

म. टा. वृतसेवा, पालघर

महाराष्ट्राच्या आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांनी हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राला उपविजेतेपदाचा बहुमान मिळवून दिला आहे. या कामगिरीबद्दल आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी स्पर्धकांचे विशेष अभिनंदन केले.

तेलंगणा आदिवासी कल्याण निवासी शैक्षणिक संस्थेच्या (टीटीडब्ल्यूआरआयएस) हैदराबाद येथील गच्चीबावली स्टेडियम येथे १४ ते १६ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत भारतातील अतिशय दुर्गम भागातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांच्या १ हजार ८०० आदिवासी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता, असे सावरा म्हणाले. आपल्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करून राज्याला २९ पदकांची कमाई करून दिली. हॉकी, कुस्ती, व्हॉलिबॉल, हँडबॉल, फुटबॉल, कबड्डी, खो-खो आणि ॲथलेटिक्स अशा खेळांचा समावेश या स्पर्धेत होता. १२ खेळ प्रकारांमध्ये महाराष्ट्रातील २०४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ६ सुवर्णपदके, १३ रौप्य आणि १० ब्राँझपदके पटकाविल्याची माहिती सवरा यांनी दिली. हॉकी या स्पर्धेमध्ये पुरुष व महिला गटाने प्रत्येकी एक-एक सुवर्णपदक व कुस्तीमध्ये ६१ किलो, ४३ किलो, ४० किलो व ३८ किलो वजनी गटामध्ये प्रत्येकी एक अशी एकूण ४ सुवर्णपदके पटकविली आहेत, असे सवरा म्हणाले....

फोटो - http://v.duta.us/WC2-dgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/JRtlKwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬