[thane] - नाशिकसाठी पुन्हा टोल

  |   Thanenews

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका बंद झाल्यामुळे निर्धास्त झालेल्या वाहन चालकांना नव्याने निर्माण होणाऱ्या आठपदरी रस्त्यासाठी पुन्हा टोल भरण्याची वेळ येऊन ठेपली आहे. वडपे-भिवंडी रस्त्याच्या आठ पदरीकरणाचे भूमिपूजन २४ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून या मार्गिका पूर्ण झाल्यानंतर तेथे पुन्हा टोलनाका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील टोलनाक्यांत त्यामुळे आणखी एकाची भर पडणार आहे.

मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या भिवंडी बायपास रोडवरील खारेगांव येथे राज्यातील पहिला टोलनाका सन १९९८ मध्ये उभारण्यात आला. १३ मे २०१७ रोजी मुदत संपल्यानंतर हा टोलनाका बंद करण्यात आला. आयआरबी कंपनीकडून या रस्त्याचे काम केल्यामुळे त्यांना या बदल्यात टोलवसुलीची परवानगी देण्यात आली होती. विशेष म्हणजे सन १९९८ मध्ये हा टोलनाका सुरू झाला असला तरी त्याची अधिकृत अधिसूचना सन २००२ मध्ये काढण्यात आली होती. रस्त्याची बांधणी आणि त्याचा देखभाल दुरूस्ती खर्च याची सांगड घालून १५ वर्षासाठी ह्या टोलनाक्यावर वसुली करण्यात आल्यानंतर १३ मे रोजी ही मुदत संपल्यानंतर टोलमुक्ती आंदोलन करणाऱ्या स्थानिक नागरिक आणि पक्षाच्या नेत्यांनी येथील टोल कर्मचाऱ्यांचा निरोप घेतला होता....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/c64c7AAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬