[thane] - फार्मसिस्टना चौकशीची मात्रा!

  |   Thanenews

बोगस पदवी रॅकेटमुळे संशय; एफडीए आणि फार्मसी कौन्सिलककडे मागितली माहिती

महेश गायकवाड, ठाणे

अधिकृत पदवी घेतलेल्या फार्मसिस्टशिवाय औषध विक्रीचे दुकान सुरू करणे आणि तिथे कर्मचारी नेमण्यावर कायद्याने बंदी आहे. ती कारवाई टाळण्यासाठी बोगस पदवीच्या आधारे फार्मसिस्टची पदवी प्राप्त केली जात असल्याचा दाट संशय ठाणे पोलिसांना आहे. तशी पदवी देणारे रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केल्यानंतर आता आपल्या हद्दीतील सर्व औषध विक्रेत्यांकडील फार्मसिस्टच्या वैधतेबाबतची चौकशी करण्यासाठी ठाणे पोलिसांकडून मोहीम उघडली जाणार आहे. आयुक्तालयाच्या हद्दीतील औषध दुकानांबरोबर फार्मसिस्ट यांची यादी गुन्हे शाखेने एफडीएकडे मागितली आहेत. तसेच, महाराष्ट्र फार्मासी कौन्सिलकडेही माहितीबाबत पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यांची शैक्षणिक पात्रता तपासली जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अरविंदकुमार भट, राजू यादव, बुधाराम आजेनिया आणि बलवंतसिंह चौहान या चार फार्मसिस्टसह डॉ. पुरुषोत्तम ताहिलरामानी अशा एकूण पाच जणांना नुकतीच अटक केली आहे. दहावी पास असलेला यादव आणि चौहान यांनी दीड लाख आणि ६० हजार रुपये मोजून राजस्थानमधील एका विद्यापीठाकडून डी फार्मसीची पदवी मिळवली आहे. डी फार्मसीची परीक्षा न देताच ताहिलरामानी याच्या ठाण्यातील दीप पॅरामेडिकल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्यांनी बोगस पदवी प्राप्त केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलकडे त्याची नोंद करून या फार्मसिस्टनी ठाणे, भिवंडीत औषध दुकान थाटल्याचेही उघड झाले आहे. फार्मसी कौन्सिलकडे नोंदणी झाल्यांनतर एफडीएकडून मेडिकल चालवण्याचा परवाना प्राप्त केला जातो. या सर्व प्रक्रियेदरम्यान फार्मसिस्टच्या कागदपत्रांची कोणत्याही प्रकारे तपासणी होत नसल्याचा आरोप होत होते. त्यातच आता ठाण्यातील प्रकार समोर आल्यानंतर या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे निष्पन्न होत आहे. केवळ ही टोळीच नव्हे तर अनेक औषध विक्रेत्यांकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदव्यांबाबत पोलिसांना संशय आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/iD6E5AAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬