[thane] - बलात्काराच्या आरोपातून शिक्षक निर्दोष

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

शाळेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून तीन शिक्षकांसह स्कूलबसमधील महिला अटेंडंट अशा एकूण चौघांची पुराव्याअभावी ठाणे सत्र न्यायालयाने मंगळवारी निर्दोष सुटका केली. मुलीच्या तक्रारीनंतर अटक झालेल्या या चारही जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला नव्हता. त्यामुळे गेली तीन वर्षे हे चौघेजण तुरुंगात खितपत पडले होते. आता त्यांना दोषमुक्त करण्यात आल्याने सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, खोट्या तक्रारीमुळे हे आरोपी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा जो मानसिक छळ झाला आहे आणि समाजात त्यांची जी बदनामी झाली आहे, ती कशी भरून निघणार? असा सवाल आरोपींचे वकील अॅड. गजानन चव्हाण यांनी 'मटा'शी बोलताना उपस्थित केला.

मिरारोड येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या या मुलीवर शाळेतील तीन शिक्षकांनी शाळेत बलात्कार केल्याचा आरोप झाल्याने मिरारोडमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकाराबाबत मुलीने घरी वर्षभरानंतर २९ ऑक्टोबर २०१५ रोजी आईला सांगितले. एक महिन्याने आईने मिरारोड पोलिस ठाण्यात धाव घेत २२ नोव्हेंबर रोजी केलेल्या तक्रारीनंतर शिक्षक संजय पाटील, जितेंद्र जाधव आणि निलेश भोईर यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शाळेतील दुसऱ्या मजल्यावरील स्टोअर रूममध्ये २०१४ च्या दिवाळीनंतर एप्रिल २०१५ आणि पुन्हा जून ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत बलात्काराचा प्रकार झाला होता. या प्रकारानंतर मिरारोडमध्ये संतापाची लाट पसरली होती. मिरारोड पोलिसांनी तिन्ही शिक्षकांसह शाळेच्या बसमधील महिला अटेंडंट उषा तुपे हिलाही अटक केली होती. उषा तुपे पीडित मुलीला स्टोअर रूममध्ये सोडायची असा तिच्यावर आरोप होता. जामीन न मिळाल्याने मागील तीन वर्षांहून अधिक कालावधीपासून चारही आरोपी ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. या खटल्याची सुनावणी ठाणे सत्र न्यायालयात सुरू होती. आरोपींच्या बाजूने न्यायालयात अॅड. गजानन चव्हाण, अॅड. मधुकर जाधव, अॅड. संतोष भामरे, अॅड. नामासाहेब मोटे या चार वकिलांनी बाजू मांडली. बचाव पक्षाचा युक्तिवाद आणि सबळ पुराव्याआभावी न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/KoVXlQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬