खड्डे दुरुस्तीचा कृती आराखडा दोन दिवसांत सादर करा

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

राज्यातील नागरिकांना भेडसावत असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांसंबंधीच्या दुरुस्तीचा कृती आराखडा दोन दिवसांत सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सोमवारी (दि.14) सुनावणीवेळी सरकारला दिला आहे. आम आदमी पक्षाचे सचिव प्रदीप पाडगावकर यांनी न्यायालयात सादर केलेल्या जनहितार्थ याचिकेवर हा आदेश देण्यात आला आहे.

राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांप्रश्‍नी त्वरीत हस्तक्षेप करावा अशी जनहीत याचिका आम आदमी पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पाडगावकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार या याचिकेवरील पुढील सुनावणी बुधवारी (दि. 16) होणार आहे.

पाडगावकर या संदर्भात बोलताना म्हणाले, राज्यात सर्वसामान्य जनतेला होणार्‍या नाहक त्रासाला सरकारी यंत्रणा जबाबदार असल्याने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील याचिकांचे काम पाहणार्‍या अ‍ॅड. जमशेद मिस्त्री यांनी या याचिकेचे काम पाहिले, असेही पाडगावकर यांनी सांगितले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/work-plan-of-pot-hole-submit-in-2-weeks-order-high-court/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Goa/work-plan-of-pot-hole-submit-in-2-weeks-order-high-court/

📲 Get goanews on Whatsapp 💬