घोषणांच्या महापुरात पूरग्रस्त शेतकरी कोरडाच!

  |   Sanglinews

बोरगाव ः वार्ताहर

पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी कोट्यावधींच्या कर्जमाफीची घोषणा करून दोन महिने उलटले तरी अद्याप बाधित शेतकर्‍यांच्या खात्यावर एक रुपयादेखील जमा झालेला नाही. शेतकरी पीककर्जाच्या व्याजाच्या बोजाखाली मात्र दिवसेंदिवस भरडतच चालला आहे.

सध्याच्या निवडणूक प्रचाराच्या धामधुमीआधी आणि आता प्रचारातही तमाम शेतकर्‍यांचा प्रत्येकाला कळवळा आला असल्याच्या घोषणा केवळ व्यासपीठावरूनच केल्या जात आहेत. मात्र जाहीर केलेल्या कर्जमाफीबद्दल सत्ताधारी व विरोधक ब्र शब्दही उच्चारताना दिसत नाहीत.

प्रामुख्याने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हजारो कोटी रुपयांच्या घोषणा करणार्‍या सत्ताधारी पक्षांच्या सभांच्या वेळी आपल्या आता तरी काही पदरात पडेल म्हणून शेतकर्‍यांचे कान टवकारले जात आहेत. परंतु पुन्हा नुसत्या घोषणा सुरू केल्या जात असल्याने एक रुपयाही पदरात न पडलेला पूरग्रस्त शेतकरी वर्ग संतप्‍त होत आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/election-champing-in-sangli-but-flood-affected-farmer-not-getting-compensation/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/election-champing-in-sangli-but-flood-affected-farmer-not-getting-compensation/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬