'जरंडेश्वर'बाबतच्या पापाचे आमदारही धनी : उदयनराजे भोसले

  |   Sataranews

कोरेगाव : प्रतिनिधी

सर्वसामान्य शेतकरी सभासदांच्या मालकीचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना, फुकाफुकी गुरु कमोडिटीजच्या घशात घालण्याचे पाप ज्यांनी केले, अशा कुकर्मी व्यक्तींना जनाची नाहीच पण आता मनाचीही लाज राहिलेली नाही. कोरेगावच्या विद्यमान आमदारांनी अशा कुकर्मी व्यक्तींना साथ दिली, त्यांच्यावर पांघरुण घातले त्यामुळे ते देखील या पापाचे धनी आहेत. हातावर हात ठेवून कारखाना गिळंकृत करण्यास सहाय्यभूत ठरलेल्या विद्यमान आमदारांना कोरगांव- खटावच्या जनतेने पुन्हा उरावर लादुन घेवू नये, अशा टिका सातारा लोकसभा मतदार संघाचे भाजपा-सेना -मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केली.

कोरेगाव मतदार संघात महेश शिंदे यांच्या ठिकठिकाणच्या प्रचार दौर्‍यात बोलताना उदयनराजे म्हणाले, राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कुणा राजकीय व्यक्तीची जिरवण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना शंकास्पद पध्दतीने लिलावात काढला. 50 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असलेल्या या कारखान्याची सुरवातीची बोली फक्त 50 कोटी ठेवण्यात आली आणि टेंडर पध्दतीने, ज्यांची बॅलन्सशीट तोलामोलाची नाही, अशा गुरु कमोडिटीजला या कारखान्याचा लिलाव केला गेला. हा कारखाना कोणा राजकीय व्यक्तीने उभारला असला तरी त्याची मालकी सर्वसामान्य सभासदांची आहे, सभासद- कामगार अडचणीत येतील त्यांचे नुकसान होईल अशा सामाजिक दायित्वाचा त्यांना विसर पडला. काहीही झाले तरी कारखाना तत्कालीन नेतृत्वाकडून काढून घ्यायचा व खाजगी करायचा असा चंगच काही मंडळींनी बांधला होता, त्यामध्ये विद्यमान आमदारही सहभागी होते, हे दुर्देव म्हणावे लागेल....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/The-owner-of-the-sin-of-Jarandeshwar-is-also-rich/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/The-owner-of-the-sin-of-Jarandeshwar-is-also-rich/

📲 Get Satara News on Whatsapp 💬