निवडणुकीच्या काळात धान्यासाठी नॉमिनीही वाढले

  |   Akolanews

अकोला: लाभार्थींना बायोमेट्रिक ओळख पटवूनच एइपीडीएसद्वारे धान्य वाटप करण्याला फाटा देत सप्टेंबर महिन्यातील ऐन निवडणुकीच्या धामधुमीत १६ जिल्ह्यांमध्ये तब्बल २० हजारांवर शिधापत्रिकांधारकांचे धान्य नॉमिनींना वाटप केले जात आहे. या प्रकरणातही अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सतीश सुपे यांनी सर्वच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना २५ आॅक्टोबरपर्यंत अहवाल मागवला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे.

शासनाकडून पॉसद्वारे विक्री झालेल्या धान्याचा दैनंदिन आढावा घेतला जातो. ज्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये नो-नेटवर्क आहे. त्या ठिकाणी शिधापत्रिकाधारकांचे आधार कार्ड पडताळणीऐवजी नॉमिनींची ओळख पटवून धान्य वाटपाची मुभा आहे. नॉमिनींची ओळख पटवण्यासाठी पुरवठा विभागाच्या रुट आॅफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. नो-नेटवर्क असलेल्या क्षेत्रातच ही सूट असताना अनेक जिल्ह्यांमध्ये नेटवर्क क्षेत्रातही आधार लिंकिंगविना नॉमिनींना धान्य वाटप केले जाते. त्यातून धान्याचा काळाबाजार करण्याच्या संधीचा पुरेपूर वापर दुकानदार, पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून केला जातो. हा प्रकार विधानसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत प्रचंड वाढला....

फोटो - http://v.duta.us/NHRGRQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/KggpEgAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬